- अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ-
- अंगापेक्षा बोंगा जास्ती- मूळ गोष्टींपेक्षा तिच्या आनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.
- अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज- गरजवंताला अक्कल नसते.
- अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
- अंगावरचे लेणे, जन्मभर देणे- दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडायचे.
- अंथरूण पाहून पाय पसरावेत- आपली ऐपत पाहून वागावे.
- अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं- एकाने काम करावे, दुसर्याने त्याचा फायदा घ्यावा.
- अंधळ्याचा हात बुडकुल्यात.
- अंधारात केले पण उजेडात आले- कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच.
- अंधेर नगरी चौपट राजा.
- अकिती आणि सणाची निचिती.
- अक्कल खाती जमा.
- अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.
- अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे- नाव मोठं लक्षण खोट.
- अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
- अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी- चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही, उलट ती चूक दुसर्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे.
- अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
- अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
- अघळ पघळ अन घाल गोंधळ.
- अघळ पघळ वेशीला ओघळ.
- अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी- एखाद्या बुद्धिमान माणसादेखील अडचणीच्या वेळी मूर्ख, दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते.
- अडली गाय खाते काय.
- अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
- अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
- अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
- अढीच्या दिढी सावकाराची सढी.
- अती खाल्ला अनं मसनात गेला- अति खाणे नुकसानकारक असते.
- अती झालं अऩ हसू आलं.
- अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
- अती तिथं माती- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच असतो.
- अती परीचयात आवज्ञा.
- अती राग भिक माग.
- अती शहाणा त्याचा बैंल रिकामा- जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातौ, त्याचे मुळीच काम होत नाही.
- अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
- अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
- अपयश हे मरणाहून वोखटे.
- अपापाचा माल गपापा.
- अपुऱ्या घड्याला डबडब फार.
- अप्पा मारी गप्पा.
- अर्धा वैद्या मरणास खाद्य.
- अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
- अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
- अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
- अल्प बुध्दी, बहु गर्वी.
- अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
- अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
- अळी मिळी गुपचिळी.
- अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
- अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
- असं कधी घडे अन सासुला जावई रडे.
- असतील चाळ तर फिटतील काळ.
- असतील मुली तर पेटतील चुली
- असुन नसुन सारखा.
- असून अडचण नसून खोळांबा.
- असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
- असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा-अनुकुलता असेल तेंव्हा चैन करायची आणि नसेल तेंव्हा उपवास करण्याची वेळ येणे.
- असेल दाम तर होईल काम.
- असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
- अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ.
- अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
- अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
- अंधेर नगरी चौपट राजा.
- आंधळा विचारतो बहिऱ्याला, वाट जाते हिवाऱ्याला?आंधळा सांगतो तंबोरा ऐंकतो.
- आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
- आंधळीपेक्षा तिरळी बरी.
- आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
- आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
- आईचा काळ, बायकोचा मवाळ.
- आईची माया अन पोर जाईला वाया- फार लाड केले तर मुले बिघडतात.
- आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
- आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
- आखुड शिंगी आणि बहुदुधी.
- आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी- रोग एकीकडे, उपाय भलतीकडे.
- आग लागल्यावर विहीर खणणे.
- आगीशिवाय धूर दिसत नाही.
- आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
- आज अंबारी, उद्या झोळी धरी.
- आजा मेला नातू झाला- एखादे नुकसान झाले असता, त्याचवेळी फायद्याची गोष्ट घडणे.
- आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
- आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली
- आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
- आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो- नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे.
- आधणातले रडतात, सुपातले हसतात.
- आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
- आधी करा मग भरा.
- आधी करावे मग सांगावे.
- आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
- आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
- आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
- आधी नमस्कार मग चमत्कार.
- आधी पोटोबा, मग विठोबा.
- आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे.
- आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
- आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास- मुळातच आळशी असणार्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
- आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
- आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
- आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा
जि.प.शाळा चारठाणा ता.मुक्ताईनगर जि.जळगाव
म्हणी
Subscribe to:
Posts (Atom)
निकालपत्रक pdf
Download in Pdf
-
Download in Pdf
-
1ली व 2री विषयनिहाय श्रेणी प्रथस/ सत्र निकाल पत्रक डाउनलोड करा विषयनिहाय मुले मुली
No comments:
Post a Comment